'लिव्ह-इन-रिलेशनशिप'मध्ये लव्ह, सेक्स आणि धोका

एका महिलेने तिचा लिव्ह-इन-पार्टनर भुवन भारवाड आणि कुटुंबीयांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सुरतमधील ही घटना आहे. 

Updated: Jan 18, 2016, 09:48 AM IST
'लिव्ह-इन-रिलेशनशिप'मध्ये लव्ह, सेक्स आणि धोका title=

सुरत : एका महिलेने तिचा लिव्ह-इन-पार्टनर भुवन भारवाड आणि कुटुंबीयांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सुरतमधील ही घटना आहे. 

'लिव्ह-इन रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या या महिलेच्या प्रियकराने घरातील ८५,००० ची रोकड, सोन्याचे दागिने आणि स्कूटर घेऊन पलायन केल्याची तक्रार तिने दिली आहे. 

३२ वर्षांच्या सोनिया गोस्वामीने ही २०११ पासून भुवन भारवाड सोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. तिच्या म्हणण्यानुसार तिने आयुष्यभरासाठी भुवनसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. 

मात्र रिलेशनशिपमध्ये राहायला लागल्यापासून भुवनने सोनियाचा लॅपटॉप, सोन्याचे दागिने घेतले. त्यात चैन, अंगठी आणि कानतील टॉप्स यांचा समावेश होता. 

इतकेच नव्हे, तर भुवने तिची स्कूटर सुद्धा घेतली. यातील कोणतीही गोष्ट भुवनने कधीही परत केली नाही. तिने जेव्हा या गोष्टी परत मागण्याचा प्रयत्न केला तेव्हा भुवनने तिला बदनाम करण्याची तसेच जीवे मारण्याचीही धमकी दिली. 

दोघांमधील संबंध इतके पुढे गेले होते कि, ती त्याला सोडून जाऊ शकत नव्हती.

सोनिया ही एक विवाहित स्त्री असून तिच्या नवऱ्याशी तिचे पटत नसल्याने ती वेगळी राहत होती. त्यानंतर ती आणि भुवन एकमेकांच्या संमतीने एकत्र राहत होते.