अयोध्येत नाही पाकिस्तानात झाला भगवान रामाचा जन्म

भगवान रामाच्या जन्मस्थळावरून एक वादग्रस्त विधान समोर आले आहे. या दाव्यानुसार राम जन्मभूमी भारताचा शेजारी देश असलेल्या पाकिस्तानात आहे. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे एक सदस्यानुसार राम जन्मभूमी यूपीतील अयोध्येत नाही तर पाकिस्तानात आहे. 

Updated: May 8, 2015, 06:58 PM IST
अयोध्येत नाही पाकिस्तानात झाला भगवान रामाचा जन्म title=

नवी दिल्ली : भगवान रामाच्या जन्मस्थळावरून एक वादग्रस्त विधान समोर आले आहे. या दाव्यानुसार राम जन्मभूमी भारताचा शेजारी देश असलेल्या पाकिस्तानात आहे. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे एक सदस्यानुसार राम जन्मभूमी यूपीतील अयोध्येत नाही तर पाकिस्तानात आहे. 

रिपोर्टनुसार ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे सदस्य अब्दुल रहिम यांनी हैदराबादमध्ये आपले पुस्तक 'अयोध्या का तनाजा' च्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. 

अब्दुल रहिम यांननी आपला दावा स्पष्ट करण्यासाठी आर्किओलॉजिस्ट जासू राम यांच्या रिसर्चचा दाखला दिला आहे. जासू यांनी या रिसर्चमध्ये म्हटले आहे की वास्तवमध्ये अयोध्येत रामाचा जन्म झाला नाही. 'रामदेरी' हे रामाचे जन्मस्थान आहे. सध्या रामदेरी हे पाकिस्तानात आहे. रहिम यांच्यानुसार भारत पाक फाळणी झाल्यानंतर रामदेरीचे नाव बदलून रहमानदेरी करण्यात आले. 

अब्दुल रहिम कुरेशी यांनी म्हटले की, रामाचे जन्मस्थान अयोध्या असल्याचा कोणताही पुरावा मिळाला नाही. इ.स. पूर्व च्या अनेक वर्षांपूर्वी अयोध्येत या युगाची सभ्यता असल्याचे कोणताही पुरावा शिल्लक नाही आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.