आईची अर्धवट 'लव्ह स्टोरी' मुलींनी पूर्ण केली

 दोन मुलींनी आपल्या आईचा विवाह प्रियकराशी लावून दिला आहे. आईचं फर्स्ट इनिंगमधलं अधुरं स्वप्न मुलींनी सेकंड इनिंगमध्ये पूर्ण केलं आहे. 

Updated: Jul 27, 2016, 06:31 PM IST
आईची अर्धवट 'लव्ह स्टोरी' मुलींनी  पूर्ण केली title=

तिरुअनंतपुरम :  दोन मुलींनी आपल्या आईचा विवाह प्रियकराशी लावून दिला आहे. आईचं फर्स्ट इनिंगमधलं अधुरं स्वप्न मुलींनी सेकंड इनिंगमध्ये पूर्ण केलं आहे. 

केरळमधील ही लव्हस्टोरी दोन मुलींनी आई ५२ वर्षाची असताना पूर्ण केली, तिचा विवाह तिच्या पूर्व प्रियकरासोबत विवाह लावून दिला.

अनिता छेम्बुविलाई  या १९८४ मध्ये वोचिरा येथील शाळेत शिक्षण घेत होत्या. दहावीमध्ये शिकत असताना त्या विक्रम या शिक्षकाच्या प्रेमात पडल्या होत्या. त्यांच्या प्रेमाची माहिती कुटुंबीयांना समजल्यानंतर संतापलेल्या वडिलांनी घाईघाईने दुसऱया व्यक्तीसोबत विवाह लावून दिला. विक्रम यांचं वय आता ६८ आहे.

विवाहानंतर हे प्रेमवीरांची पुन्हा कधीच भेट होऊ शकली नाही.  अनिता आपल्या संसारात रमून गेल्या, त्यांना दोन मुली झाल्या, मात्र अचानक त्यांच्या आयुष्यात दु:खाचा डोंगर कोसळला, त्यांचे पतीने आत्महत्या केली. पतीच्या निधनानं त्या खचल्या असल्या तरी त्यांनी दोन्ही मुलींना उच्च शिक्षण दिले, त्यांचे विवाह केले.

अनिता यांच्या मुलींना त्यांच्या आईच्या प्रेमाबद्दल माहिती समजली होती. दोघींनी आईची प्रेम कहाणी पूर्ण करण्याचे ठरवले. अनिता यांच्या एका मुलीने विक्रम यांचा शोध सुरू केला. विक्रम यांची भेट घेऊन त्यांना सर्व माहिती सांगितली. यावेळी त्यांच्याही पत्नीचे निधन झाल्याचे समजले.  अनिता यांच्या दोन्ही मुलींनी पुढाकार घेतला आणि अनिता आणि विक्रम यांचा विवाह लावून दिला.