जम्मू-काश्मीरच्या फेरमतदानावेळी तिघांनीच केलं मतदान

जम्मू-काश्मीरमध्ये मतदारांनी निवडणुकीकडे पाठ फिरवल्याचंच चित्र कायम आहे.

Updated: Apr 13, 2017, 10:39 PM IST
जम्मू-काश्मीरच्या फेरमतदानावेळी तिघांनीच केलं मतदान title=

बडगाम : जम्मू-काश्मीरमध्ये मतदारांनी निवडणुकीकडे पाठ फिरवल्याचंच चित्र कायम आहे. श्रीनगर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत 38 मतदान केंद्रांवर आज फेरमतदान झालं. यावेळी केवळ 2 टक्के मतदारांनी आपला मुलभूत हक्क बजावला.

राज्यामध्ये आजवरही ही सर्वात कमी टक्केवारी ठरलीये. या जागेसाठी रविवारी पोटनिवडणूक झाली होती. त्यावेळी केवळ साडेसहा टक्के नागरिकांनी मतदान केलं. 38 केंद्रांवर त्यावेळी झालेल्या हिंसाचारामुळे आज फेरमतदान घेण्यात आलं. यामध्ये 34 हजार 169पैकी केवळ 709 मतदारांच्या बोटाला शाई लागल्याचं दिसलं.

खानसाहीब इथं एकही मत पडलं नाही तर बडगाममध्ये केवळ तिघांनी मतदान केलं. आजच्या मतदानानंतर संपूर्ण मतदारसंघाची टक्केवारी 7.13 इतकी झालीये. 15 मतमोजणी होईल.