घरगुती सिलेंडर ३ रूपयांनी महागला

घरगुती सिलेंडरच्या किंमतीत ३ रूपयांनी वाढ झाली आहे. दरवाढीचा निर्णय आज केंद्र सरकारकडून घेण्यात आला. 

Updated: Oct 29, 2014, 02:08 PM IST
घरगुती सिलेंडर ३ रूपयांनी महागला title=

नवी दिल्ली : घरगुती सिलेंडरच्या किंमतीत ३ रूपयांनी वाढ झाली आहे. दरवाढीचा निर्णय आज केंद्र सरकारकडून घेण्यात आला. 

सरकारकडून वितरकांना देण्यात येत असलेल्या कमिशनमध्ये वाढ करण्यात आलीय. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. 

वितरकांच्या कमिशनमध्ये गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता गेल्या आठवड्यात वाढ करण्यात आली आहे. 

आता वितरकांना प्रत्येक 14.2 किलोग्रॅम सिलिंडरमागे 43.71 रुपयांची कमिशन मिळत आहे. 

सिलिंडरच्या दरात गेल्यावेळी 3.46 रुपयांची वाढ करण्यात आली होती. आता करण्यात आलेल्या दरवाढीमुळे दिल्लीत 14.2 किलोग्रॅमचा सिलिंडर 417 रुपयांना मिळणार आहे. 

मुंबईमध्ये तो 452 रुपयांना मिळेल. सरकारकडून प्रत्येक ग्राहकाला 12 अनुदानित सिलिंडर दिले जातात. त्यानंतर ग्राहकाला विनाअनुदानित सिलिंडर विकत घ्यावा लागतो. 

विनाअनुदानित सिलिंडरची किंमतही यामुळे 883.50 रुपये झाली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.