नवी दिल्ली : रेल्वे प्रवासादरम्यान मध्यप्रदेशच्या अर्थमंत्र्यांसह त्यांच्या पत्नीला लुटलंय. ही धक्कादायक घटना मथुरेमधील कोसीकलनजवळ रेल्वेप्रवासादरम्यान घडली. मध्यप्रदेशचे अर्थमंत्री जयंत मलैया हे कुटुंबासह जबलपूरपासून दिल्लीला जाणाऱ्या निझामुद्दीन एक्सप्रेसमधून प्रवास करत होते.
रेल्वेत शिरलेल्या एका टोळीने त्यांच्याकडील रोख रकमेसह काही मौल्यवान वस्तू पळविल्या. " त्यांनी आमच्याकडील रोख रकमेसह काही मौल्यवान वस्तू पळविल्या. त्यानंतर घटनास्थळी रेल्वे पोलिस पोचले' अशी माहिती सुधा मलैया यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
चोरी करणाऱ्या दहा ते बारा जणांच्या एका टोळीने नियोजनबद्धपणे ही चोरी केली असल्याचेही त्या पुढे म्हणाल्या. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.