बिग बाजारनं मॅगीची विक्री थांबवली, सर्व आऊटलेट्समधून मॅगी हद्दपार

देशभरात मॅगी नूडल्सचा वाद वाढत चाललाय. दिल्लीमध्ये खराब गुणवत्ता बघता अन्न आणि औषध प्रशासन विभागानं मॅगीच्या विक्रीवर बंदी घातलीय. आता मॅगी केंद्र सरकारच्या सर्व भंडारांमधून हद्दपार झाली आहे. तर  'बिग बाझार'नंही मॅगीला मोठा झटका दिलाय. सर्व आऊटलेटमधून मॅगी आऊट करण्यात आलीय.

Updated: Jun 3, 2015, 03:12 PM IST
बिग बाजारनं मॅगीची विक्री थांबवली, सर्व आऊटलेट्समधून मॅगी हद्दपार title=

नवी दिल्ली: देशभरात मॅगी नूडल्सचा वाद वाढत चाललाय. दिल्लीमध्ये खराब गुणवत्ता बघता अन्न आणि औषध प्रशासन विभागानं मॅगीच्या विक्रीवर बंदी घातलीय. आता मॅगी केंद्र सरकारच्या सर्व भंडारांमधून हद्दपार झाली आहे. तर  'बिग बाझार'नंही मॅगीला मोठा झटका दिलाय. सर्व आऊटलेटमधून मॅगी आऊट करण्यात आलीय.

बिग बाजार शिवाय ईजीडे आणि काही इतर आउटलेट्सनेही आपल्या स्टोअरमधून मॅगी न विकण्याचा निर्णय घेतलाय. यादरम्यान देशाच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागानं (FSSAI)नं सर्व राज्यांकडून मॅगच्या सँपलचा रिपोर्ट मागवलाय. देशभरात मॅगीचे अनेक नमुने सदोष आढळल्यामुळं, बिग बाजारनं हे पाऊल उचललं आहे.
 
मॅगीनं मोनोसोडियम ग्लुटामेट अर्थात एमएसजी आणि शिशाचा वापर मर्यादेपेक्षा जास्त केल्याचं तपासातून समोर आलं आहे. या दोन्हीचं अतिरिक्त सेवन तब्येतीला धोकादायक ठरु शकतात. याची दखल घेत लखनौच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागानं मॅगीचा परवाना रद्द करुन देशात मॅगीच्या विक्रीवर बंदी घालावी, अशी शिफारस केंद्रीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाला (एफएसएसएआय) केली आहे. 

दरम्यान, दिल्लीत अन्न आणि औषध प्रशासनाच्या तपासणीत मॅगीच्या १३ पैकी १० नमून्यांमध्ये दोष आढळून आला आहे. १० नमुन्यात शीसे प्रमाणापेक्षा जास्त आढळल्याचं दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. तसंच सर्व दोषींविरोधात कडक कारवाईचं आश्वासन देण्यात आलं आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.