गेल्या १० वर्षांत भारतातील धार्मिक स्थळांतील भीषण दुर्घटना

मुंबई : केरळमधील कोल्लम इथल्या मंदिरात रविवारी सकाळी लागलेल्या आगीत जवळपास १०० जणांचा मृत्यू झाला.

Updated: Apr 10, 2016, 05:00 PM IST
गेल्या १० वर्षांत भारतातील धार्मिक स्थळांतील भीषण दुर्घटना

मुंबई : केरळमधील कोल्लम इथल्या मंदिरात रविवारी सकाळी लागलेल्या आगीत जवळपास १०० जणांचा मृत्यू झाला. इतकी भयानक घटना होण्याची ही पहिली वेळ नाही. भारतात गेल्या १० वर्षांत अशा अनेक घटना झाल्या. या बातमीत घेऊ या अशा १० जीवघेण्या घटनांचा आढावा. 

१० ऑगस्ट २०१५ 
श्रावण महिन्यात पुत्तिंगल मंदिरात मोठ्या संख्येने भाविक येतात. तेव्हा झालेल्या दुर्घटनेत ११ जण दगावले होते. तर ५० पेक्षा जास्त जण जखमी झाले होते.  
 
१४ जुलै २०१५ 
आंध्र प्रदेशातील राजमुंदरी जिल्ह्यातील गोदावरी पुश्करालूच्या वेळी झालेल्या दुर्घटनेत २२ जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत जास्तकरुन महिलांचा समावेश होता. 

३ ऑक्टोबर २०१४ 
पाटण्याच्या गांधी मैदानात दसऱ्याला झालेल्या दुर्घटनेत झालेल्या चेंगराचेंगरीत ३२ लोकांचा मृत्यू झाला होता. 

१८ जानेवारी २०१४ 
बोहरा समाजाचे धर्मगुरू यांच्या घरी जमलेल्या भाविकांमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत १८ लोकांचा मृत्यू झाला होता. 

१३ ऑक्टोबर २०१३ 
मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यातील रतनगढ मंदिरात नवरात्री पूजनाच्या काळात पसरलेल्या घबराटीने चेंगराचेंगरी झाली. यात ८९ लोकांचा मृत्यू झाला. 

१० फेब्रुवारी २०१३ 
कुंभमेळ्याच्या वेळी अलाहबाद स्टेशनवर जमलेल्या गर्दीत झालेल्या चेंगराचेंगरीत ३६ लोकांचा मृत्यू झाला होता. 

१९ नोव्हेंबर २०१२ 
छठ पूजेच्या वेळी पाटण्यात झालेल्या चेंगराचेंगरीत २० जणांचा मृत्यू झाला होता. 

८ नोव्हेंबर २०११ 
हरिद्वारमध्ये गंगा घाटावर झालेल्या घटनेत २२ लोकांचा मृत्यू झाला होता. 

१४ जानेवारी २०११ 
केरळमधील शबरीमाला मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत १०६ लोकांनी आपला जीव गमावला होता. 

४ मार्च २०१० 
प्रतापगढमध्ये एका स्वघोषित बाबाने लोकांना मोफत कपडे वाचण्याचे आश्वासन दिले होते. हे कपडे घेण्यासाठी जमलेल्या जमावात चेंगराचेंगरी झाल्याने ६३ लोक दगावले होते. 

३० सप्टेंबर २००८ 
राजस्थानातल्या जोधपूर येथील चामुंडा देवी मंदिरात झालेल्या दुर्घटनेत १२० लोकांचा मृत्यू झाला होता. २०० जणांपेक्षा जास्त जण जखमी झाले होते. 

३ ऑगस्ट २००६
हिमाचल प्रदेशातील नैना देवी मंदिरात झालेल्या दुर्घटनेत १५० जणांचा मृत्यू झाला होता. तर ४०० जण यात गंभीर जखमी झाले होते. 

२६ जानेवारी २००५ 
महाराष्ट्रातील साताऱ्यात झालेल्या एका दुर्घटनेत ३५० जणांचा मृत्यू झाला होता.