बंगळुरु : एका व्यक्तीने २ विवाह केले त्यानंतर त्याला दोन पत्नींचा खर्च परवडत नव्हता. म्हणून त्यांनी खर्च भागवण्यासाठी चक्क बाईक चोरी करणं सुरु केलं. बाईक चोरी करणा-या या आरोपीला बंगळुरु पोलिसांनी अटक केली आहे. मुरली रामराव हा हमाल आहे. हमालींमधून मिळणा-या पैशातून दोन कुटुंबाचा खर्च भागत नसल्याने त्याने बाईक चोरीला दुसरा धंदा सुरु केला होता.
मुरली जेव्हा पत्नीला भेटायला जायचा तेव्हा तो जाताना बीएमटीसी बसने जायचा पण येतांना त्याच्याकडे चोरलेली बाईक असायची. मुरलीने आतापर्यंत शहराच्या विविध भागातून २५ पेक्षा अधिक बाईक चोरल्या होत्या.
५ जुलै रोजी मंत्री मॉल समोरुन बाईक चोरतांना पोलिसांनी त्याला अटक केली. आरोपीकडून १५ लाख रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत. अटक केल्यानंतर मुरलीने चौकशीत दोन कुटुंबांचा खर्च भागवण्यासाठी चोरी करत होतो असे सांगितले. जेव्हा मुरलीच्या बायका त्याला बाईकबद्दल विचारायच्या तेव्हा तो मित्राच्या बाईक आहे असं त्यांना सांगायचा. यामध्ये त्यांचा काहीच हात नसल्याचं त्याचं म्हणणं आहे. पोलास याबाबत अजून चौकशी करत आहेत.