आयपीएलच्या सट्ट्यात त्यानं पत्नीवरच लावली बोली, आणि...

आयपीएल मॅचेसमध्ये क्रिकेटच्या नावाखाली कसा गोरखधंदा सुरू आहे, याचं आणखीन एक उदाहरण समोर आलंय. एका महिलेनं आपल्या पतीनं आपल्याला सट्ट्साठी बोलीवर चढवल्याचा आरोप केलाय. 

Updated: May 28, 2016, 04:27 PM IST
आयपीएलच्या सट्ट्यात त्यानं पत्नीवरच लावली बोली, आणि...

मुंबई : आयपीएल मॅचेसमध्ये क्रिकेटच्या नावाखाली कसा गोरखधंदा सुरू आहे, याचं आणखीन एक उदाहरण समोर आलंय. एका महिलेनं आपल्या पतीनं आपल्याला सट्ट्साठी बोलीवर चढवल्याचा आरोप केलाय. 

उत्तरप्रदेशातल्या कानपूरमध्ये हे प्रकरण समोर आलंय. सट्ट्यात हरल्यानंतर आता या महिलेचा पती फरार झालाय. परंतु, त्याच्या कृत्याची फळं मात्र पत्नीला भोगावी लागतायत. 

पत्नीची लावली बोली...

पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, तिच्या पतीनं आपल्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा करून ठेवलाय. यासाठी त्यानं घरही विकायला काढलं. सट्ट्याच्या नादापायी त्यानं संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त करून ठेवलंय. इतकंच नाही तर या सट्ट्यात त्यानं आपल्या पत्नीवरही बोली लावलीय. 

कर्ज घेऊन या महिलेचा पती फरार झालाय. कर्ज वसूलीसाठी येणारे लोक मात्र आपल्याशी घरी येऊन अश्लील गोष्टी बोलतात, अशी महिलेनं तक्रार केलीय.

पोलीस या महिलेच्या फरार पतीचा शोध घेत आहेत. शिवाय कर्ज देणाऱ्यांविरोधातही कारवाई करण्यात येईल, असं पोलिसांनी म्हटंलय.