www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
देशाचे मावळते पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाला संबोधित केलेल्या निरोपाच्या भाषणात स्वत:च्या कारकिर्दीतील निर्णयांचे समर्थन केले. त्यांचे भाषण झाल्यानंतर त्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे सादर केला. राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा स्वीकारला. त्यामुळे भाजप म्हणजेच नरेंद्र मोदींचा सरकार स्थापण्याचा मार्ग मोकळा झालाय. मात्र, त्यांची तारीख अजून ठरलेली नाही.
गेल्या दहा वर्षांमध्ये आम्ही जे प्रगतीचे टप्पे पार केले आहेत, यापुढेही अशीच भारताची प्रगती होत राहो, अशी आशा मनमोहन सिंग यांनी व्यक्त केली. यावेळी पंतप्रधानांनी आगामी काळात सत्तेत येणाऱ्या एनडीए सरकारला शुभेच्छा देताना येणाऱ्या काळात नव्या सरकारला त्यांच्या कामात यश मिळावे असा आशावाद व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीत जनतेचा कौल आम्हाला मान्य आहे. जनतेच्या निर्णयाचा आम्हाला आदर आहे. देशाने मला आतापर्यंत खूप काही दिले आहे. मला आणखी काही नको आहे. दहा वर्षांपूर्वीच्या भारतापेक्षा आताचा भारत हा खूप सक्षम झाला आहे. देशाला अजूनही देशात विकासाची गरज असून, यापुढेही देश प्रगती करत राहील, असा पुनरउच्चार त्यांनी केला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.