मराठी साहित्य संमेलन : पंजाबचा सांस्कृतिक कार्यक्रम!

पंजाबमध्ये घुमान इथं होणाऱ्या 'मराठी साहित्य संमेलन २०१५'चा खर्च उचलण्याची तयारी पंजाब सरकारनं दाखवलीय. तसंच हे संमेलन पंजाबचा  सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून पार पडणार आहे. 

Updated: Mar 7, 2015, 03:56 PM IST
मराठी साहित्य संमेलन : पंजाबचा सांस्कृतिक कार्यक्रम! title=

मुंबई : पंजाबमध्ये घुमान इथं होणाऱ्या 'मराठी साहित्य संमेलन २०१५'चा खर्च उचलण्याची तयारी पंजाब सरकारनं दाखवलीय. तसंच हे संमेलन पंजाबचा  सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून पार पडणार आहे. 

पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांनी तशी घोषणा केल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला यांनी दिलीय. 

पंजाब सरकार घुमानमध्ये संत नामदेवांच्या नावाने महाविद्यालय सुरू करणार आहे. तर संमेलननाच्या उदघाटनाच्या दिवशी म्हणजे ३ एप्रिलला महाविद्यालयाचा 'कोनशिला समारंभ' पार पडणार आहे. 

घुमानला राष्ट्रीय तीर्थक्षेत्र घोषित करण्यासाठी पंजाब सरकार पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे देखील देसडला यांनी सांगितले आहे. 

मराठी संमेलन पंजाबी नागरिकांना कळावं म्हणून संमेलनाचे सर्व कार्यक्रम अनुवादित करणार असल्याची माहिती  देसडला यांनी दिली आहे. 

महाराष्ट्राचे आजी माजी पाच मुख्यमंत्री उद्घाटन समारोपाला उपस्थित राहणार आहेत. तसेच, पाच ते दहा हजार रसिक राज्यातून घुमानला जाणार असून, त्यांची सर्व तयारी करण्यात आली आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.