लग्नाच्या फेऱ्याआधी नवरदेवाचं सत्य आलं समोर, सगळ्यांनाच बसला धक्का

आज ही भारतात अॅरेंज मॅरेज हे सुरक्षित मानलं जातं पण जालंदरमध्ये एक अशी घटना घडली आहे ज्यामुळे तुमचा विश्वास उडून जाईल. एका युवकाचं लग्न होण्यापूर्वीच लग्न मोडलं जेव्हा त्याच्या विदेशात राहणाऱ्या पत्नीला माहित पडलं की तो दुसरं लग्न करतोय.

Updated: Apr 4, 2016, 09:05 PM IST
लग्नाच्या फेऱ्याआधी नवरदेवाचं सत्य आलं समोर, सगळ्यांनाच बसला धक्का title=

नवी दिल्ली : आज ही भारतात अॅरेंज मॅरेज हे सुरक्षित मानलं जातं पण जालंदरमध्ये एक अशी घटना घडली आहे ज्यामुळे तुमचा विश्वास उडून जाईल. एका युवकाचं लग्न होण्यापूर्वीच लग्न मोडलं जेव्हा त्याच्या विदेशात राहणाऱ्या पत्नीला माहित पडलं की तो दुसरं लग्न करतोय.

पहिल्या पत्नीने तिच्या आईसह अन्य काही लोकांना पोलीस स्थानकात पाठवलं आणि त्यानंतर पोलिसांनी ते लग्न थांबवलं. त्यानंतर होणाऱ्या दुसऱ्या पत्नीला आणि तिच्या कुटुंबाला ही धक्का बसला जेव्हा त्यांना हे सत्य कळालं.

युवकाची पहिली पत्नी ही इंग्लंड राहते. याचं १३ वर्षापूर्वी लग्न झालं असून त्याला ९ वर्षाची मुलगी देखील आहे. ही घटना समोर आल्यानंतर अनेकांना चांगलाच धक्का बसला आहे.