जोडप्याने गुपचूप केले लग्न, नंतर समजले पती निघाला भाऊ

Updated: Sep 16, 2015, 09:07 PM IST
जोडप्याने गुपचूप केले लग्न, नंतर समजले पती निघाला भाऊ  title=

 

अहमदाबाद :  तुम्हांला वाटतं की लव स्टोरीमध्ये ट्विस्ट केवळ बॉलीवूड चित्रपटात होते, पण असं नाही अहमदाबादच्या एका कपलची लव स्टोरी तुम्हांला विचार करण्यास भाग पाडणार आहे. काही महिन्यांपूर्वी झाले लग्न झाल्यानंतर त्यांच्या लाइफमध्ये एक ट्विस्ट आला पती-पत्नी मामे भाऊ-बहिण निघाले. 

अहमदाबाद मिररने दिलेल्या बातम्यानुसार आता पती पत्नीपासून वेगळं होऊ इच्छितो आहे. त्यामुळे पत्नीने आता या विरोधात महिला पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिस यात सुवर्णमध्य काढण्याचा विचार करीत आहे. त्यांनी दोघांना चर्चेसाठी बोलावले आहे. 

काही महिन्यापूर्वी दोघांची ओळख एका लग्नात झाली होती. २४ वर्षीय बी कॉम ग्रॅज्युएट आणि एक प्रायव्हेट फर्ममध्ये कार्यरत असलेली तरूणी एका सहकाऱ्याचा लग्नात आली होती. तर २६ वर्षीय तरूण आपल्या मित्राच्या लग्नात आला होता. यात दोघांची ओळख वाढली. दोघांनी एकमेकांचे फोन नंबर घेतले. दोन्ही एकाच जातीचे असल्याने त्यांच्या लग्नात काही अडचण येणार नाही हे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर काही महिने ते संपर्कात होते. 
त्यानंतर तरूणीने आपल्या करिअरसाठी एक वर्ष मागितलं. तरूणीला वाटलं की या काळात ती आपल्या नातेवाईकांची मनधरणी करेल. तरूणीच्या घरच्यांनी होकार दिला. चांगल स्थळ हातचं जाऊ नये म्हणून दोघांनी गांधीनगरमध्ये एका मंदिरात लग्न केलं. तसेच रजिस्टर लग्नही केलं. करिअरसाठी तरूण आणि तरूणी आपआपल्या घरी राहू लागले. 

या पर्यंत सर्व ठीक होते, पण तरूणीच्या आईच्या नातेवाईकांच्या लग्नात एक मोठा खुलासा झाला. तरूणीच्या मामाने तरूणाचा परिचय करून दिला की तो तुझा भाऊ आहे. यानंतर सर्वांना धक्का बसला. त्यांनी लग्नात काही बोलले नाही. पण आता मुलाला संबंध तोडायचे आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.