नवी दिल्ली: मध्य प्रदेश उर्दू अॅकेडमीच्या सचिव नुसरत मेहदी यांनी नावाजलेले शायर मझर भोपाली यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. दुसऱ्या सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसारखी तुम्हीही भगवी अंतर्वस्त्र घालायला सुरवात करा असं वादग्रस्त वक्तव्य मझर भोपालींनी केल्याचा आरोप नुसरत मेहदी यांनी केला आहे.
मझर यांनी महिलेच्या अंतर्वस्त्राविषयी वक्तव्य करून माझ्या सन्मानाला ठेच पोहोचवली आहे. शायर असलेल्या माणसानं जास्त संवेदनशील असलं पाहिजे, आणि सभ्य भाषेचा उपयोग केला पाहिजे, असं नुसरत मेहदी म्हणाल्या आहेत.
दरम्यान मझर भोपाली यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. मी असं कोणतंही वक्तव्य केलं नसल्याचं मझर म्हणाले आहेत. मी कोणाच्याही कपड्यांवर बोललो नाही, तर नुसरत यांच्या अॅकेडमीचं भगवेकरण झाल्याची टीका मी केली, अशी प्रतिक्रिया मझर यांनी दिली आहे.
मी 2 मार्चला नुसरत यांच्याविरोधात मुख्यमंत्री कार्यालयामध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपींची तक्रार दाखल केली, त्यामुळे नुसरत माझ्यावर आरोप करत आहेत, असं मझर म्हणाले आहेत.