३१ मेला जग नष्ट होणार, भयंकर भूकंप येणार असल्याचा दावा

 ३१ मे ला जग संपणार असा दावा

Updated: May 24, 2017, 11:15 PM IST
३१ मेला जग नष्ट होणार, भयंकर भूकंप येणार असल्याचा दावा title=

नवी दिल्ली : जग संपणार असा दावा आतापर्यंत अनेकदा करण्यात आला आहे. मागील वर्षी देखील असा दावा करण्यात आला होता. पण असं काहीच नाही झालं. पण अनेक संकटं आली ज्यामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला. जेव्हा अशी भविष्यवाणी होते तेव्हा सगळेच विचार करायला लागतात.

यूट्यूबच्या माध्यमातून आता ही भविष्यवाणी केली गेली आहे. 31 मे 2017 ला जग संपणार असा दावा करण्यात आला आहे. हा व्हिडियो व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं आहे की ३१ मे ला भंयकर भूकंप येणार आहे. ज्यामध्ये जग संपणार आहे. या व्हिडिओला 13 ऑक्टोबर 2016 ला यूट्यूबवर अपलोड केला गेला होता. आतापर्यंत 13 लाखाहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे. जगाचा अंत - 31 मे, 2017, धरतीवर होणार काही तरी मोठं ? असं नाव त्याला देण्यात आला आहे.

स्टीफन हॉकिंग यांनी देखील इशारा दिला होता की बदलत्या वातावरणामुळे स्वतःला वाचवण्यासाठी मनुष्याला दुसरी धरती शोधली पाहिजे. 100 वर्षानंतर पृथ्वीवर लोकांचं राहणं कठिण होणार आहे. बीबीसीच्या एका डॉक्यूमेंट्री एक्पेडिशन न्यू अर्थमध्ये हॉकिंग आणि त्याचा विद्यार्थी क्रिस्टोफ गलफर्डने यांनी सांगितलं होती बाहेरच्या धरतीवर मनुष्य कसा राहू शकतो.

पाहा व्हिडिओ