कामाचा वाढता ताण, कामाचा वेळ आणि आहारातील निष्काळजीपणा, अनहेल्दी खाण्यावर भर यामुळे आपण अनेक आजारांना आमंत्रण देतो. तुमच्या जीवनशैलीमुळे अनेक जुनाट आजार तुम्हाला डोकवर काढतात. त्यासोबत शारीरिकदृष्ट्या निष्क्रिय असाल, किंवा तुम्हाला काही आजारांचा कौटुंबिक इतिहास असेल, तर तुम्हाला भविष्यात गंभीर आरोग्य समस्या निर्माण होण्याचा धोका जास्त असतो. पण काही आजार असे असतात जे कितीही काळजी घेतली तरी तुम्हाला होताचच. तुम्हाला तर ही लक्षणं दिसत तर नाही ना? (these 3 diseases are self correcting in the body health news in marathi)
तुम्हाला धक्का बसला असेल पण तुमच्या शरीरातील दोषामुळे तुम्ही काही आजारांना बळी पडू शकता. अशा रोगांना स्वयंप्रतिकार रोग म्हणजेच ऑटोइम्यून डिसीज असं म्हणतात. जेव्हा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच्या निरोगी पेशी, ऊती आणि अवयवांवर हल्ला करते तेव्हा स्वयंप्रतिकार रोग उद्भवतात. यामुळे शरीरात जळजळ होण्याचा धोका वाढतो, ज्यामुळे अनेक प्रकारचे आजार होण्याचा धोका बळावतो.
ऑटोइम्यून रोग शरीराने स्वतःच तयार करतात म्हणून सर्व लोकांना त्याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे, आरोग्य तज्ज्ञ सांगतात. अभ्यास दर्शविते की 80 पेक्षा जास्त प्रकारचे स्वयंप्रतिकार रोग असतात. आरोग्य तज्ज्ञ म्हणतात की या आजारांवर कोणताही उपचार नसतात. तुमची इच्छा असूनही त्या आजाराला तुम्ही थांबवू शकत नाही. या समस्यांचे निदान झालेल्या लोकांच्या उपचारांमध्ये लक्षणे व्यवस्थापित करण्यासाठी औषधे आणि सहाय्यक थेरपीची मदत घेतली जाते.
मधुमेह हा एक गंभीर आजार आहे ज्याचा धोका जागतिक स्तरावर वेगाने वाढताना दिसतोय. टाईप-2 मधुमेह हे अतिशय सामान्य आहे ज्यासाठी कौटुंबिक इतिहास, जीवनशैली आणि आहारातील गडबड ही मुख्य कारणे मानली जातात. पण तुम्हाला माहीत आहे का की टाइप-1 मधुमेह हा एक स्वयंप्रतिकार रोग आहे?
हा आजार तेव्हा होतो जेव्हा आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती स्वादुपिंडाच्या इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशी नष्ट करू लागते. हे सर्वात सामान्यपणे मुलांमध्ये निदान केलं जातं. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणंय की, या मधुमेहाने ग्रस्त असलेल्यांना आयुष्यभर इन्सुलिन घेत राहावं लागतं. त्याची गुंतागुंत आणि लक्षणे तंतोतंत टाइप-2 सारखीच दिसतात.
ही देखील एक सामान्य समस्या असून ज्याचा धोका जागतिक स्तरावर वाढत आहे. ऑस्टियोआर्थरायटिस सारख्या संधिवाताची प्रकरणे शारीरिक निष्क्रियता आणि इतर काही कारणांमुळे होऊ शकतात, जरी संधिवात हा एक स्वयंप्रतिकार रोग आहे. संधिवात हा एक जुनाट (दीर्घकाळ टिकणारा) स्वयंप्रतिकार रोग आहे. जो मुख्यतः सांध्यांना प्रभावित करतो. जेव्हा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच्या शरीराच्या ऊतींवर हल्ला करते तेव्हा ही समस्या उद्भवू शकते. या आजारामुळे सांध्यातील वेदना, सूज, कडकपणा आणि कार्यक्षमता कमी होते. गंभीर परिस्थितीत, चालणे आणि उठणे देखील कठीण होतात.
मल्टिपल स्क्लेरोसिस हा देखील एक स्वयंप्रतिकार रोग आहे जेव्हा शरीराची रोगप्रतिकारक प्रणाली मेंदू आणि पाठीच्या कण्यातील मज्जातंतूंच्या संरक्षणात्मक आवरणावर हल्ला करते. या अवस्थेमुळे रुग्णाला दृष्टी समस्या, चालण्यात अडचण, स्नायू कमकुवत होणे, बधीरपणा-मुंग्या येणे, थकवा-चक्कर येणे, शरीरात जडपणा, हादरे, वेदना इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागते.
ही समस्या सर्व वयोगटातील लोकांमध्ये दिसून येते. मात्र प्रौढ आणि महिलांमध्ये अधिक सामान्य आहे. या आजाराचे वेळीच निदान आणि उपचार न केल्यास त्याचा जीवनमानावर विपरीत परिणाम होण्याचा धोका असतो.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)