नवी दिल्ली : भारतात परतायची इच्छा कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याने व्यक्त केली होती, असा गौप्यस्फोट माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांनी केलाय. मात्र गुन्हेगार हस्तांतरणांतर्गत दाऊदला परत आणण्याचे प्रयत्नच कधी झाले नाहीत, अशी टीका यावेळी जेठमलानी यांनी केली.
डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याचा विश्वासू सहकारी छोटा शकील १९९३च्या बॉम्बस्फोटानंतर भारताला शरण येण्यास तयार होते. मात्र, महाराष्ट्रातील तत्कालीन सरकारचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी नकार दिल्यामुळे ही योजना फिसकटल्याचा खळबळजनक गौफ्यस्फोट राम जेठमलानी यांनी केला.
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी हा दावा केला. १९९३च्या बॉम्बस्फोटानंतर दाऊद आणि छोटा शकील यांनी मी लंडनमध्ये असताना माझ्यासमोर तशाप्रकारचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, भारतात आल्यानंतर पोलीसांकडून छळ होण्याची शक्यता लक्षात घेता आम्हाला आमच्या निवासस्थानी नजरकैदेत ठेवण्यात यावे, अशी त्या दोघांची मागणी होती. तत्कालीन राज्य सरकारने अशाप्रकारची हमी देण्यास नकार दिल्याने ही सर्व योजना बारगळली, असे ते म्हणालेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.