'मायक्रोसॉफ्ट'नं कर्मचाऱ्यांना दिली खुशखबर...

मायक्रोसॉफ्ट इंडियानं आपल्या कर्मचाऱ्यांना एक खुशखबर दिलीय. कंपनीनं आपल्या महिला कर्मचाऱ्यांना 'मॅटर्निटी लिव्ह' दुप्पट केलीय. 

Updated: Jan 30, 2016, 10:59 AM IST
'मायक्रोसॉफ्ट'नं कर्मचाऱ्यांना दिली खुशखबर... title=

नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्ट इंडियानं आपल्या कर्मचाऱ्यांना एक खुशखबर दिलीय. कंपनीनं आपल्या महिला कर्मचाऱ्यांना 'मॅटर्निटी लिव्ह' दुप्पट केलीय. 

मायक्रोसॉफ्टच्या महिला कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांची मॅटर्निटी लिव्ह मिळणार आहे. शिवाय या महिला कर्मचाऱ्यांना दोन वर्षांपर्यंत कामकाजात लवचिक व्यवस्थाही मिळणार आहे. 

मायक्रोसॉफ्ट इंडियानं दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या कार्यालयात स्वस्थ आणि उत्पादक वातावरणाला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. 

नुकतंच, फ्लिपकार्टनंही आपल्या कर्मचाऱ्यांची मॅटर्निटी लिव्ह वाढवलीय. सोबतच अशा महिलांना पिक-अप आणि ड्रॉपची सुविधाही देण्यात आलीय.