पंतप्रधानांच्या आदर्श गावातून मिळणार दही, तूप, लोणी!

लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'आदर्श ग्राम योजने'त दत्तक घेतलेल्या उत्तरप्रदेशातील जयापूर या गावातील दूध आणि इतर दुग्धोत्पादने उद्या बाजारात दिसली तर आश्चर्य वाटून घेऊ नका.

Updated: Jan 30, 2016, 10:03 AM IST
पंतप्रधानांच्या आदर्श गावातून मिळणार दही, तूप, लोणी! title=

लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'आदर्श ग्राम योजने'त दत्तक घेतलेल्या उत्तरप्रदेशातील जयापूर या गावातील दूध आणि इतर दुग्धोत्पादने उद्या बाजारात दिसली तर आश्चर्य वाटून घेऊ नका.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांची संस्था असलेल्या 'अमेरिकन इंडिया फाऊंडेशन'तर्फे या गावात एक गोशाळा उघडण्यात आलीय. 'काऊशाळा' असं त्या गोशाळेचं नामकरणही करण्यात आलंय. भारत आणि अमेरिकन संस्थेच्या संयुक्त उद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आल्याने 'काऊशाळा' असं या गोशाळेचं नामकरण करण्यात आलंय.

या काऊशाळेत २०० पेक्षाही जास्त गायी ठेवण्याची व्यवस्था असेल, अशी माहिती आहे. या गोशाळेतील गायींच्या दूधासोबतच त्यांचे गोमुत्र आणि शेणसुद्धा बाजारात विकण्याची योजना आहे. 'जयापूर ब्रँड' या नावाखाली ही उत्पादने बाजारात विकली जातील.

उत्तर प्रदेशच्या पूर्वांचल भागातील ही सर्वात अत्याधुनिक गोशाळा असेल. गायींचे दूध काढण्यासाठी यंत्रांचा वापर केला जाईल. त्याचप्रमाणे त्यांचा थंडीपासून बचाव करण्यासाठी जमिनीवर रबर मॅट्स असतील. उन्हाळ्यात गरमीपासून बचावासाठी कूलर्सची व्यवस्था असेल.

जयापूर गावातील नागरीक गायी खरेदी करतील आणि येथे ठेवतील. गोशाळेतील कर्मचारी गायींची काळजी घेतील. उत्पादनातून आलेल्या पैसे देखभालीचा खर्च वगळून बाकी सर्व नफा गायींच्या मालकांना दिला जाईल.