मायक्रोसॉफ्ट देणार फ्री इंटरनेट

मायक्रोसॉफ्ट इंडियाने देशातील इंटरनेट कनेक्टिव्हीटीला अधिक उत्तम बनविण्यासाठी भारत सरकारला एक प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावात कंपनी दुर्गम भागांना इंटरनेटशी जोडण्यासाठी आणि इंटरनेट सुविधेवरील खर्च कमी करण्यासंदर्भात उल्लेख केला आहे. दरम्यान, या संदर्भात सरकारकडून कोणतेही वक्तव्य आले नाही. पण सरकारची या प्रस्तावावर अनुकूल होण्याची शक्यता अधिक दिसत आहे. विशेष म्हणजे सरकारने नुकतेच डिजीटल इंडिया कॅम्पेन लॉन्च केले होते. त्यामुळे सरकार याबाबत सकारात्मक विचार करू शकते. 

Updated: Nov 13, 2014, 07:27 PM IST
मायक्रोसॉफ्ट देणार फ्री इंटरनेट title=

मुंबई : मायक्रोसॉफ्ट इंडियाने देशातील इंटरनेट कनेक्टिव्हीटीला अधिक उत्तम बनविण्यासाठी भारत सरकारला एक प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावात कंपनी दुर्गम भागांना इंटरनेटशी जोडण्यासाठी आणि इंटरनेट सुविधेवरील खर्च कमी करण्यासंदर्भात उल्लेख केला आहे. दरम्यान, या संदर्भात सरकारकडून कोणतेही वक्तव्य आले नाही. पण सरकारची या प्रस्तावावर अनुकूल होण्याची शक्यता अधिक दिसत आहे. विशेष म्हणजे सरकारने नुकतेच डिजीटल इंडिया कॅम्पेन लॉन्च केले होते. त्यामुळे सरकार याबाबत सकारात्मक विचार करू शकते. 

दूरदर्शनच्या माध्यमातून मिळणार फ्री इंटरनेट 
मायक्रोसॉफ्टने दिलेल्या प्रस्तावानुसार दोन टीव्ही चॅनलमध्ये मिळणाऱ्या व्हाइट स्पेसचा वापर इंटरनेटसाठी करता येऊ शकतो. दोन टीव्ही चॅनलच्या मध्ये एक मोठा अनयुज्ड स्पेक्ट्रम असतो त्याला व्हाईट स्पेस म्हणतात. मायक्रोसॉफ्ट नुसार या स्पेसचा वापर करून भारतीय जनतेला स्वस्त इंटरनेट उपलब्ध होऊ शकतो. 

टीव्ही चॅनलमध्ये लाँग रेंज स्पेक्ट्रम
मायक्रोसॉफ्टने दिलेल्या माहितीनुसार वाय-फायची रेंज १०० मीटरपर्यंत असते. तर २०० ते ३०० मेगाहर्ट्स चा स्पेक्ट्रम१० किलोमीटरपर्यंत पोहचतो. कंपनीनुसार हा स्पेक्ट्रम सरकारी टीव्ही चॅनल दूरदर्शनकडे उपलब्ध आहे. हा स्पेक्ट्रम वापरण्यात येत नाही. विशेष म्हणजे या प्रोजेक्टच्या माध्यमातून कंपनी देशभरात इंटरनेट कनेक्टिव्हीटी वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. 

फ्री इंटरनेटने होणार सर्वांना फायदा 
मायक्रोसॉफ्ट इंडिया चीफ भास्कर प्रामाणिक यांनी सांगितले की, या प्रोजेक्टने भारताच्या दुर्गम भागात इंटरनेट पोहचविता येणार आहे. या प्रोजेक्टच्या माध्यमातून असा इको सिस्टम तयार करण्यात येईल त्याचा फायदा मायक्रोसॉफ्टसह सर्व बिझनेस ऑर्गनायझेशनला फायदा होणार आहे. यामुळे राऊटर मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन्सचा समावेश आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.