बिहार विधानसभा एमआयएम लढविणार : ओवेसी

बिहारमधील विधानसभा निवडणुकीत अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहदूल मुस्लिमीनने (एमआयएम) उडी घेतली आहे. याबाबत पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी माहिती दिली.

Updated: Sep 13, 2015, 10:04 AM IST
बिहार विधानसभा एमआयएम लढविणार : ओवेसी title=
छाया - डीएनए

हैदराबाद : बिहारमधील विधानसभा निवडणुकीत अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहदूल मुस्लिमीनने (एमआयएम) उडी घेतली आहे. याबाबत पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी माहिती दिली.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक एआयएमआयएमने लढविल्यानंतर आता बिहार विधानसभेसाठी तयारी केली आहे. बिहार विधानसभेच्या निवडणुकीत सीमांचल प्रदेशातून पक्ष निवडणूक लढविणार आहे. सीमांचल प्रदेशातील अरारिया, पूर्णिया, किशनगंज आणि कटिहार या जिल्ह्य़ांतील विधानसभा मतदारसंघांतूनच उमेदवार रिंगणात उतरविण्यात येणार आहेत, असे ओवेसी यांनी सांगितले.

सीमांचल प्रदेशाच्या हितासाठी आणि न्यायासाठी आम्ही तेथून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे, असे ओवेसी म्हणाले. मात्र पक्ष किती जागा लढविणार आहे ते ओवेसी यांनी स्पष्ट केले नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.