www.24taas.com, झी मीडिया, लखनऊ
जात प्रमाणपत्राच्याबाबतीत एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. भाजपचे नेते आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि पॉर्नस्टार सनी लिओन यांच्या नावाने चक्क ऑनलाईन अर्ज उत्तर प्रदेश प्रशासनाकडे आला आहे. या अर्जाने अधिकाऱ्यांना धक्काच बसलाय. बनावट अर्जाबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.
जात प्रमाणपत्र ऑनलाईन देण्याची सुविधा उत्तर प्रदेश प्रशानाने सुरु केली आहे. मात्र, ही सुविधा प्रशासनाच्या अंगलट आल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आलेय. ऑनलाईन सुविधेमुळे बोगस अर्ज येत आहेत. अनुपशहर लोकवाणी जण सेवा केंद्राच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. एका अर्जानुसार नरेंद्र मोदी यांच्या फोटो लावलेला अर्ज आलाय. तर दुसऱ्या अर्जावर चक्क पॉर्नस्टार सनी लिओन हिचा फोटो आहे. याप्रकरणी तहसीलदार यांनी लोकवाणी केंद्र संचालक यांच्याकडे विचारणा करून स्पष्टीकरण मागितले आहे.
चंपा राणी, पिता शेरसिंग, राहण्याचे ठिकाण चचरई असा एक अर्ज पाठविण्यात आलाय. या अर्जावर नरेंद्र मोदी यांचा फोटो आहे. तर दुसऱ्या एका अर्जावर सनी लिओन हिचा फोटो आहे. वडिलांचे नाव नाही. मात्र, निवासाचा पत्ता लिओन तंग गली, भट्ट कॉलनी, मुंबई असा उल्लेख आहे. हा प्रकार गंभीर आहे, अशी माहिती तहसीलदार अजय कुमार अम्बष्ट यांनी दिलेय. ही गंभीर बाब लोकवाणी संचालकाने का पाहिली नाही. अर्जावर कोणाचा फोटो आहे, हे पाहणे गरजेचे होते. उत्तर प्रदेशमध्ये जात प्रमाणपत्र अर्ज असेल तर मुंबईचा पत्ता कसा काय अर्जावर येतो, असा सवालही तहसीलदार यांनी उपस्थित केलाय. याबाबत त्यांच्याकडे स्पष्टीकरण मागितल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, आमच्याकडून असे काही झालेले नाही. तहसीलदार कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांनी असं केलं असेल. ऑपरेटरकडून पासवर्ड घेऊन खोटा अर्ज टाकला आहे. मला फसविण्यासाठी हे केलं आहे, असा उलटा आरोप केंद्र संचालक ब्रह्मपाल सिंग यांनी केलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.