मोदी सरकार देणार प्रत्येकाला 'पॅन कार्ड'

 जन धन योजने योजनेप्रमाणे सर्वांना 'पॅन कार्ड' देण्यासाठी सरकारतर्फे आता 'ऑनलाइन' सुविधा सुरू केली जाणार असल्याची सुत्रांची माहिती आहे  'ऑनलाइन' सुविधेमुळे अर्जदार ४८ तासांच्या आत पॅन कार्ड प्राप्त करू शकणार आहे. याशिवाय, केंद्र सरकारतर्फे 'पॅन कार्ड' देण्यासाठी विशेष कॅम्प लावण्यात येणार आहेत. विशेषतः ग्रामीण भागात कॅम्प लावण्यात येणार असून ग्रामीण भागातील लोकांना 'पॅन कार्ड' उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

Updated: May 11, 2015, 08:46 PM IST
मोदी सरकार देणार प्रत्येकाला 'पॅन कार्ड' title=

नवी दिल्ली :  जन धन योजने योजनेप्रमाणे सर्वांना 'पॅन कार्ड' देण्यासाठी सरकारतर्फे आता 'ऑनलाइन' सुविधा सुरू केली जाणार असल्याची सुत्रांची माहिती आहे  'ऑनलाइन' सुविधेमुळे अर्जदार ४८ तासांच्या आत पॅन कार्ड प्राप्त करू शकणार आहे. याशिवाय, केंद्र सरकारतर्फे 'पॅन कार्ड' देण्यासाठी विशेष कॅम्प लावण्यात येणार आहेत. विशेषतः ग्रामीण भागात कॅम्प लावण्यात येणार असून ग्रामीण भागातील लोकांना 'पॅन कार्ड' उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

देशभरातील २४-२५ कोटी कुटुंबांपैकी आतापर्यंत सुमारे २१ कोटी व्यक्तींना 'पॅन कार्ड' देण्यात आले आहे. त्यात कार्पोरेट क्षेत्रात काम करणार्‍या 7.5 लाख व्यक्तींचा समावेश आहे. "आम्ही पॅन कार्ड मिळवण्यासाठीची प्रक्रिया सोपी करणार आहोत. प्रधानमंत्री जन धन योजनेमध्ये आम्ही प्रत्येकाला सामावून घेऊ शकलो तर सर्वांना 'पॅन कार्ड' देखील उबलब्ध करून देऊ शकतो.' असे केंद्रीय अर्थराज्यमंत्री जयंत सिन्हा यावेळी म्हणाले. 

 पॅन कार्ड मिळविण्यासाठी फोटो असलेले ओळखपत्र (मतदान कार्ड), आधार कार्ड आणि "जन्म तारीख"असलेले वैध पुरावे देणे आवश्यक आहे. एका विशिष्ट रक्कमेच्या (एक लाख रुपये) पलीकडे कोणतीही स्थावर मालमत्ता खरेदी वा विक्री करण्यासाठी, उत्पन्नावरील कर भरण्यासाठी किंवा मोटर, वाहनांच्या खरेदी-विक्रीसाठी पॅन कार्ड आवश्यक आहे. 

एक लाख रुपयांहून अधिकच्या रक्कमेची खरेदी किंवा विक्री करण्यासाठी 'पॅन' देणे बंधनकारक केले जाणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मोदी सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पामध्ये केली होती. परंतु, केंद्र सरकारच्या या निर्णयावर अनेक आक्षेप घेण्यात आले होते. "देशातील; विशेषतः ग्रामीण भागातील बहुसंख्य नागरिकांकडे 'पॅन कार्ड' नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या नियमाची पूर्णपणे अंमलबजावणी होणे कठीण असल्याचे,' मत व्यक्त करण्यात आले होते. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.