३० डिसेंबरनंतर पंतप्रधान मोदी उचलणार मोठे पाऊल

मोदी सरकार ३० डिसेंबरनंतर काळा पैसा बाळगणा-यांच्या विरोधात जोरदार कारवाई करण्यास सज्ज झालेय. 

Updated: Dec 26, 2016, 02:13 PM IST
३० डिसेंबरनंतर पंतप्रधान मोदी उचलणार मोठे पाऊल title=

नवी दिल्ली : मोदी सरकार ३० डिसेंबरनंतर काळा पैसा बाळगणा-यांच्या विरोधात जोरदार कारवाई करण्यास सज्ज झालेय. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारच्या सभेत म्हटले होते की बेईमानी करणाऱ्यांची आता खैर नाही. ज्यांनी चुकीच्या मार्गाने पैसा मिळवलाय तसेच काळा पैसा बाळगणा-यांची बेईमान लोकांच्या त्रासाचे दिवस सुरू झाले आहेत. 

८ नोव्हेंबरला मोदींनी नोटाबंदी जाहीर केल्यानंतर सरकार प्रत्येक बँक अकाऊंट तसेच लॉकरवर नजर ठेवून आहे. आयकर विभागाने नोटाबंदीनंतर संशयित देवाणघेवाण होणाऱ्या अकाऊंट होल्डर्स आणि लॉकर होल्डर्स यांची यादी तयार केलीये. 

विभागाने यापूर्वीच मोठ्या प्रमाणात संशयित देवाण-घेवाणीप्रकरणी अनेकांना नोटिसा बजावल्यात. ३० डिसेंबरनंतर आयकर विभागाकडून कडक कारवाई सुरु केली जाणार आहे.