प्रत्येकाला लोन देणार मोदी सरकार, व्याजदर होणार कमी

नोटबंदीनंतर पैशांची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवत होती. मोदी सरकारकडून सर्वकाही सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु आहे. मोदी सरकारने या काळात अनेक मोठे निर्णय घेतले. त्यानंतर आणखी एक मोठी घोषणा सरकारकडून होऊ शकते. मध्यम वर्ग, उच्च मध्यम वर्गासाठी सरकार हाउसिंग लोनवरील व्याजावर सूट देऊ शकते.

Updated: Jan 8, 2017, 02:40 PM IST
प्रत्येकाला लोन देणार मोदी सरकार, व्याजदर होणार कमी title=

नवी दिल्ली : नोटबंदीनंतर पैशांची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवत होती. मोदी सरकारकडून सर्वकाही सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु आहे. मोदी सरकारने या काळात अनेक मोठे निर्णय घेतले. त्यानंतर आणखी एक मोठी घोषणा सरकारकडून होऊ शकते. मध्यम वर्ग, उच्च मध्यम वर्गासाठी सरकार हाउसिंग लोनवरील व्याजावर सूट देऊ शकते.

ज्यांचं उत्पन्न महिन्याला दीड लाखापर्यंत आहे त्यांना देखील याचा फायदा होऊ शकतो. सरकारने जर ही योजना लागू केली तर पहिल्यांदाच या ग्रुपमधील लोकांना अशी स्कीम मिळू शकणार आहे. 

नोटबंदीनंतर ५० दिवस पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित करत असतांना हाउसिंग लोनवर सबसिडी देण्याचा उल्लेख केला होता. पण ही स्किम कोणत्या वर्गासाठी होती हे नव्हतं सांगितलं होतं. पंतप्रधानांनी ३१ डिसेंबरला देशाला केलेल्या संबोधनात म्हटलं होतं की, शहरी भागात ९ लाखावरील होम लोनवर ४ टक्के सूट तर १२ लाखांच्या लोनवर ३ टक्के सूट मिळेल.

ग्रामीण भागात जुनं घर बांधण्यासाठी २ लाखावरील लोनवर व्याजात ३ टक्के सूट दिली जाईल. पंतप्रधानांच्या या संबोधनानंतर हाउसिंग मिनिस्ट्रीने या स्कीमवर काम करणं सुरु केलं आहे. ही पंतप्रधान आवास योजनाच आहे पण याची मर्यादा ६ लाखापेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांसाठी वाढवण्यात आली आहे.