रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली : केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी नोटबंदी म्हणजे काळ्या मांजरीच्या बांधलेली घंटा अशा शब्दांत काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. तसेच, नवीन वर्षात दाऊद इब्राहीमला भारतात आणण्याचा प्रयत्न असणार आहे.
- नोटबंदी करून काळ्या मांजरीच्या गळ्यात घंटा बांधली आहे
- ही घंटा वाजयला सुरूवात झाली आहे
- त्याचे परिणाम काळा पैसा ठेवणा-यांना भोगावे लागत आहे.
- ५० दिवसात नोटबंदीचा निर्णय यशस्वीपणे अंमलात आणला गेला
- नोटबंदीचे परिणाम येत्या पाच राज्यातील निवडणूकावर दिसून येतील.
- लोक नोटबंदी निर्णयाच्या बाजूने उभे आहेत.
- लोकांनी जुन्या नोटा जवळ ठेवू नये आणि काळा पैसा बाहेर निघावा यासाठी नवीन अध्यादेश काढला गेला.
- काँग्रेस आणि राष्ट्रवादीला ६० वर्षे आंदोलन करावे लागेल.
- भाडेकरू माणसं घेऊन काँग्रेस राजकारण करत आहे.
- काँग्रेसचे राजकारण लहान मुलासारखे बनले आहे.
- नोटबंदीमुळे नक्षलवादाला आळा घालणे शक्य झाले आहे.
- नक्षलवाद आणि दहशतवादासाठी काळा पैशाचा वापर केला जात असे
- नवीन वर्षात दाऊद ईब्राहीमला अटक करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- आम आदमी पार्टीला कुरघोडीमुळे करण्याची खाज आहे.
- नवीन उपराज्यपाल अनिल बैजल चांगले काम करतील
- बैजल यांना प्रशासनाचा चांगला अनुभव आहे.