नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या विसाव्या मन की बात मध्ये महाराष्ट्राच्या जलयुक्त शिवार योजनेचं कौतुक केलं आहे. येत्या काळात महाराष्ट्रावर येणाऱ्या संकटांवर मात करण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरेल असा विश्वास मोदींनी यावेळी व्यक्त केला.
याशिवाय येत्या काळात भारतात कॅशलेस सोसायटीची संकल्पना अमलात आणण्यासाठी सर्व नागरिकांनी पुढाकार घ्यावा असं आवाहनही मोदींनी केलं. त्याचप्रमाणे जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं पर्यावरण वाचवण्यासाठी नागरिकांच्या सक्रिय सहभागाचं महत्व मोदींनी पटवून देण्याचा प्रयत्न केला.
शिवाय 21 जूनला होणाऱ्या जागतिक योग दिनाच्या निमित्तानं सर्वांनी आपल्या जीवनात योगसाधनेचा मार्ग स्वीकारावा असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे.