माकडांनी काढली तरुणीची छे़ड आणि फाडले कपडे

मुलींना मुलं छेडतात अशा घटना आत्तापर्यंत आपण ऐकला असेल पण माकडं महिलांना छेडतायत हे तुम्ही ऐकलं आहे का ? हो पण हे खरंय... जयपूरमधल्या बिलडी येथील वीरपूरमध्ये महिलांना घराबाहेर पडणं कठिण झालंय. 

Updated: Apr 4, 2016, 04:37 PM IST
माकडांनी काढली तरुणीची छे़ड आणि फाडले कपडे title=

नवी दिल्ली : मुलींना मुलं छेडतात अशा घटना आत्तापर्यंत आपण ऐकला असेल पण माकडं महिलांना छेडतायत हे तुम्ही ऐकलं आहे का ? हो पण हे खरंय... जयपूरमधल्या बिलडी येथील वीरपूरमध्ये महिलांना घराबाहेर पडणं कठिण झालंय. 

महिला बाहेर दिसताच ही माकडं महिलांचे कपडे ओढतात किंवा फाडून टाकतात तर कधी गालावर पंजा मारतात. आतापर्यंत १२ हून अधिक महिलांना या माकडांना जखमी केलंय. 

एक युवती जेव्हा ऑफिसला जात होती तेव्हा काही माकडांनी या तरुणीवर अचानक हल्ला केला आणि तिचे कपडे फाडून टाकले. काही लोकांनी या तरुणीला या माकडांच्या हल्ल्यातून वाचवलं.