'गंगे'साठी 6337 करोड रुपयांचा निधी

आज संसदेत सादर झालेल्या अर्थसंकल्पात गंगा नदीवर आधारित विविध योजनांसाठी जवळपास 6337 करोड रुपयांचा निधीचा निर्धारित करण्यात आलाय. 

Updated: Jul 10, 2014, 03:54 PM IST
'गंगे'साठी 6337 करोड रुपयांचा निधी title=
फाईल फोटो

नवी दिल्ली : गंगेला स्वच्छ करण्याचा अजेंडा समोर ठेऊन पहिल्या दिवसापासून मोदी सरकार यासाठी प्रयत्न करत आहे. आज संसदेत सादर झालेल्या अर्थसंकल्पात गंगा नदीवर आधारित विविध योजनांसाठी जवळपास 6337 करोड रुपयांचा निधीचा निर्धारित करण्यात आलाय. 

आज संसदेत सादर झालेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गंगा नदिला वाचविण्यासाठी आणि 'जल मार्ग विकासा'साठई तब्बल 4200 करोड रुपयांचा प्रस्ताव पास केलाय. या योजनेद्वारे अलाहाबाद ते हलदियापर्यंत 1620 किलोमीटर लांबीचा जलमार्ग सुरु करण्यात येईल. पुढच्या सहा वर्षांत गंगा जलमार्ग पूर्ण करणार असल्याची घोषणाही जेटली यांनी केलीय. 

गंगा स्वच्छतेसाठी भरीस रकमेची तरतूद करून मोदी सरकारनं याच प्रयत्नात एक पाऊल पुढे टाकलंय. नद्यांच्या जोडणीसाठी एक टीम अभ्यासदेखील करणार आहे. केदारनाथ, हरिद्वार, कानपूर, वाराणसी, अलाहाबाद, पटना आणि दिल्ली येथील विविध नद्यांवरच्या घाटाच्या विकासासाठी आणि नुतनीकरणासाठी 100 करोड रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलाय. 

तसंच ‘नमामी गंगा’ योजनेसाठी 2037 करोड रुपयांचा प्रस्ताव मांडला गेलाय. यामुळे, गंगेला पुन्हा एकदा पवित्र नदीचा दर्जा मिळवून देण्याचा मोदी सरकारचा हेतू आहे. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.