फेसबूकमुळे गेला तरूणीचा जीव...

 तामिळनाडूच्या सेलममध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी फेसबूकमुळे एका २१ वर्षीय तरूणीला प्राण गमवावा लागला आहे. या तरूणीचा फोटो अज्ञात व्यक्तींनी मॉर्फ्ड करून म्हणजे त्यात छेडछाड करून त्याला अश्लिल केले होते. 

Updated: Jun 28, 2016, 06:52 PM IST
 फेसबूकमुळे गेला तरूणीचा जीव... title=

सेलम :  तामिळनाडूच्या सेलममध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी फेसबूकमुळे एका २१ वर्षीय तरूणीला प्राण गमवावा लागला आहे. या तरूणीचा फोटो अज्ञात व्यक्तींनी मॉर्फ्ड करून म्हणजे त्यात छेडछाड करून त्याला अश्लिल केले होते. 
 
पोलिसांकडे तक्रार केल्यानंतरही हा फोटो हटविण्यात न आल्याने या युवतीने फाशी घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. मृत तरूणी सेलममध्ये आपल्या जिल्ह्यात आपल्या आई-वडीलांसोबत राहत होती. 

तरुणीने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये जे काही लिहिले त्यानुसार   तीने अश्लिल फोटो पाठवले नाही यावर तिच्या आई-वडीलांना तिच्यावर विश्वास नव्हता. 

तिने लिहिले की जगून काय फायदा की माझ्या आई-वडिलांना माझ्यावर विश्वास नाही. दरम्यान तरूणीच्या आई-वडिलांनी आरोप केला की कारवाईची मागणी केल्यावर पोलिसांनी त्यांच्याकडे लाच मागितली.