नवी दिल्ली : मुलाच्या मृतदेहासोबत एक वृद्ध महिला चार दिवस बसून राहिली होती. , शहरातील काली बारी मार्गावरील एका घरामध्ये मृत्युमुखी पडलेल्या मुलाशेजारी ही महिला बसली होती.
साठी ओलांडलेली आई रामदुलारी आणि अवघ्या ३२ वर्षाचा मुलगा कपिल हे दोघेच घरामध्ये राहात होते. रामदुलारी यांच्या पतीचे मागील वर्षी निधन झाले, यापूर्वी तीन मुलींचे विवाह झाले आहेत. कपिल गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. झोपेत असतानाच त्याचा मृत्यू झाला. मात्र, कपिल झोपेत असेल असे समजून माता त्याच्या मृतदेहाशेजारी ४ दिवस बसून राहिली.
दरम्यान, शेजारच्यांना मृतदेहाचा वास येऊ लागला, याबाबतची माहिती त्यांच्या मुलींना आणि पोलिसांना कळविली. पोलिसांनी मृतदेह रुग्णालयात हलवण्यात आा. कपीलच्या मृत्युमुळे रामदुलारी यांच्या मनावर काहीतरी परिणाम झाला आहे, असे त्यांच्या मुलींनी म्हटले आहे.