इंटरनेट विश्वात क्रांती करणारे मुकेश अंबानी घेतात एवढा पगार

मुकेश अंबानींनी रिलायन्स जियो 4G लॉन्च केलं आहे. भारतातल्या इंटरनेट विश्वामधली ही क्रांती असल्याचं बोललं जात आहे.

Updated: Sep 1, 2016, 08:34 PM IST
इंटरनेट विश्वात क्रांती करणारे मुकेश अंबानी घेतात एवढा पगार  title=

मुंबई : मुकेश अंबानींनी रिलायन्स जियो 4G लॉन्च केलं आहे. भारतातल्या इंटरनेट विश्वामधली ही क्रांती असल्याचं बोललं जात आहे. मुकेश अंबानी हे भारतातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहेत. जुलै 2016 मध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार मुकेश अंबानींकडे एकूण 18.9 बिलियन युएस डॉलर एवढी संपत्ती आहे. 

मुकेश अंबानी हे गेल्या आठ वर्षांपासून वार्षिक 15 कोटी रुपये वेतन घेत आहेत. स्वेच्छेने 2008-09 पासून त्यांनी आपलं वेतन 15 कोटी रुपयांवर कायम ठेवलं आहे. रिलायंस इंडस्ट्रीजच्या 2015-16 या वार्षिक अहवालात ही माहिती देण्यात आली. मुकेश अंबानी 15 कोटी रुपये वेतन घेत असले तरी रिलायन्सच्या शेअर्सवर होणाऱ्या नफ्यावर त्यांना वेगळा डिव्हिडंट मिळतो.