राज ठाकरेंनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला केलं अभिवादन

बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्तानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतल्या विविध ठिकाणच्या आंबेडकर पुतळ्याला अभिवादन केलं. राज ठाकरेंनी दुपारी चेंबूरमधल्या आंबेडकर उद्यानातल्या पुतळ्याला पुष्पहार वाहून अभिवादन केलं. नंतर घाटकोपरमधल्या अमृत नगरमध्ये सुरु करण्यात आलेल्या वाचनालायला भेट दिली. तिथे त्यांनी मनसे नगरसेवक संजय भालेराव यांनी स्थापन केलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचीही पाहणी केली. त्यानंतर घाटकोपरमधल्या रमाबाई नगर प्रवेशद्वारावरच्या बाबासाहेबांच्या पुतळ्यालाही अभिवादन केलं. 

Updated: Apr 14, 2016, 05:31 PM IST
राज ठाकरेंनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला केलं अभिवादन title=

मुंबई : बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्तानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतल्या विविध ठिकाणच्या आंबेडकर पुतळ्याला अभिवादन केलं. राज ठाकरेंनी दुपारी चेंबूरमधल्या आंबेडकर उद्यानातल्या पुतळ्याला पुष्पहार वाहून अभिवादन केलं. नंतर घाटकोपरमधल्या अमृत नगरमध्ये सुरु करण्यात आलेल्या वाचनालायला भेट दिली. तिथे त्यांनी मनसे नगरसेवक संजय भालेराव यांनी स्थापन केलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचीही पाहणी केली. त्यानंतर घाटकोपरमधल्या रमाबाई नगर प्रवेशद्वारावरच्या बाबासाहेबांच्या पुतळ्यालाही अभिवादन केलं.