कोझीकोड : मुस्लिम मतं बाजारातील वस्तू नाही, असं म्हणत मोदींनी मुस्लिमांना व्होट बँक म्हणणाऱ्या विरोधकांवर निशाणा साधला आहे. मुस्लिमांच्या मताचं राजकारण भाजपनं कधीच केलं नाही, असंही मोदी म्हणाले आहेत.
केरळमधल्या कोझिकोड इथे भाजपच्या तीन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीची सांगता झाली. या कार्यक्रमामध्ये मोदींनी विरोधकांना लक्ष्य केलं.