लैंगिक सुख मिळत नसल्याने घटस्फोट

पतीकडून शारीरिक सुख मिळत नसल्यानं एका महिलेनं घटस्फोट मागितलाय. 

Updated: Mar 22, 2016, 01:09 PM IST
लैंगिक सुख मिळत नसल्याने घटस्फोट title=

कोलकाता : पत्नी आणि पती यांचे नाते भरण्यासाठी सेक्स करणं खूप जरुरीचे आहे. अन्यथा दोघांच्या नात्यात दूर पडते. असाच एक प्रकार पश्चिम बंगालमध्ये पुढे आलाय. पतीकडून शारीरिक सुख मिळत नसल्यानं एका महिलेनं घटस्फोट मागितलाय. ही महिल्या एवढ्यावर न थांबता लग्नात सासरच्यांना दिलेले पैसे आणि काही वस्तूही परत मागितल्यात.

दोन आठवड्यांपूर्वी बर्दवान जिल्ह्यातील खेचुरी येथील अब्बास मस्तान (बदललेले नाव) याच्यासोबत नजमाचे (बदललेले नाव) लग्न झाले होते. लग्नानंतर नजमाचे कुटुंबीय तिला भेटण्यासाठी तिच्या घरी गेले. त्यावेळी अब्बासमध्ये असलेल्या लैंगिक समस्यांविषयी नजमाने त्यांना सांगितले. याबाबत न्याय मागायला हवा, असा सल्ला कुटुंबीयांनी तिला दिला.

कुटुंबीयांचा सल्ला मनावर घेत नजमाने 'स्ट्रीट सरव्हायव्हर्स इंडिया' या संस्थेच्या शबनम रमास्वामी यांची भेट घेतली. त्यांना पतीबाबत सांगितलं. हे प्रकरण तेथील एका न्यायालयात गेले. शनिवारी दोघांच्याही कुटुंबीयांच्या उपस्थितीत नजमाला घटस्फोट मिळाला. आमच्या गावात यापूर्वी अशा प्रकारे अनेक लग्न मोडले आहेत. पण कोणत्याही मुलीने पतीमध्ये असलेल्या लैंगिक समस्यांबाबत उघडपणे सांगितले नाही. याविषयी बोलण्यास मी घाबरत नाही, असं नजमा म्हणाली. 

अब्बासचे कुटुंबीय बुधवारी येणार आहे. त्यांच्याकडे घटस्फोटाची कागदपत्रे देण्यात येतील. त्याचवेळी निकाहाच्यावेळी दिलेली रक्कम परत घेण्यात येणार आहे. पतीमधील लैंगिक समस्यांबाबत मी बोलले नसते तर, आयुष्यभर याचा मला त्रास सहन करावा लागला असता, असे नजमा म्हणाली.