आईने अल्पवयीन मुलीला दारू पाजली आणि....भयानक

आपल्या सावत्र मुलीला जबरदस्तीने दारू पाजली. त्यानंतर तिघांनी त्या मुलीवर सामूहिक बलात्कार केला. 

Updated: Mar 22, 2016, 12:05 PM IST
आईने अल्पवयीन मुलीला दारू पाजली आणि....भयानक title=

काशीपूर, उधमसिंगनगर : सावत्र आईचे कृत्य पाहून तुम्ही हैरान व्हाल. आपल्या सावत्र मुलीला जबरदस्तीने दारू पाजली. त्यानंतर तिघांनी त्या मुलीवर सामूहिक बलात्कार केला. विरोध करणाऱ्या या तरुणीला जोरदार मारहाण करण्यात आली.

१७ वर्षीय तरुणी तिच्या सावत्र आईबरोबर राहते. यावेळी त्या रात्री तीन तरुण दारू घेऊन घरी आलेत. सावत्र आईने मुलीला जबरदस्तीने दारू पाजली. त्यावेळी आलेल्या तीन तरुणांनी तिचे कपडे फाडले. जबरदस्ती करण्यास सुरुवात केली. त्यावेळी पीडित तरुणीने विरोध केला. त्यावेळी त्यातील एकाने तिला मारहाण केली. त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ती शुद्धीवर आली असताना तिने आरडा-ओरडा केला. त्यावेळी तिचा भाऊ मदतीला धाऊन आला. यावेळी तिघांनी तेथून पळ काढला.

पीडित मुलीच्या नातेवाईकांनी तिला रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी रुग्णालयाने पोलिसात तक्रार करण्यास सांगितले. पोलिसांत गेल्यानंतर पोलिसांनी महिला पोलीस नसल्याचे सांगून तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला.