गुवाहाटी: आसाममध्ये विधानसभा निवडणुका सुरु आहेत, पण या निवडणुकांच्या दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भाजपला मत दिलं म्हणून एका पतीनं पत्नीला घटस्फोट दिला आहे. आसामच्या स्थानिक वृत्तपत्रांमध्ये ही बातमी प्रसिद्ध झाली आहे.
दिलवारा बेगमनं काँग्रेसऐवजी भाजपला मत दिल्यामुळे तिचा पती अईनुद्दीन भडकला आणि त्यानं दिलवाराला घटस्फोट दिला. अईनुद्दीन आणि दिलवारा जिकडे राहत होते त्या गावानं काँग्रेसला मत द्यायचा फतवा काढला होता. आसाम जिल्ह्याच्या सोनितपूर जिल्ह्यामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.