मुस्लिमांच्या सशक्तिकरणासाठी कटीबद्ध – मोदी

हिंदुत्वाची प्रतिमा असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी संसदेतील भाषणात मुसलमानांच्या सशक्तीकरणावर जोर दिला आहे. मुसलमानांच्या परिस्थितीत आम्हांला बदल आणला पाहिजे, समाजाचे एक अंग कमकुवत राहिले तर समाज सुदृढ होऊ शकत नाही.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jun 12, 2014, 01:51 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
हिंदुत्वाची प्रतिमा असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी संसदेतील भाषणात मुसलमानांच्या सशक्तीकरणावर जोर दिला आहे. मुसलमानांच्या परिस्थितीत आम्हांला बदल आणला पाहिजे, समाजाचे एक अंग कमकुवत राहिले तर समाज सुदृढ होऊ शकत नाही.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर लोकसभेत झालेल्या चर्चेवर उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले, मी लहान होतो. तेव्हा पाहिले की एका मुस्लिम बांधवाचे सायकल रिपेरिंगचे दुकान होते. आजही त्याची तिसरी पिढी तेच काम करीत आहे. समाजातील कोणतेही अंग दुर्बल राहिले तर समाज सुदृढ होऊ शकत नाही. या मूलभूत भावनेने आम्हांला काम करायचे आहे आणि आम्ही कटीबद्ध आहोत. आपल्या देशात विकासाच्या नव्या परिभाषेची गरज आहे.
अभिभाषणात चर्चे दरम्यान एमआयएमक्यूएमचे असदुद्दीन ओवैसी, काँग्रेसचे एम. आयम शाहनवाज सह काही सदस्यांनी मुसलमानांच्या विषयावर सरकारला आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.