www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षात सोशल मीडियांचा प्रभाव प्रामुख्याने जाणवला. भाजपने ही ताकद ओळखून निवडणुकीसाठी ‘नरेंद्र मोदी फॉर पीएम’ अशी अनोखी मोहीम सुरु केली. या मोहिमेत एका विशिष्ट क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर भाजपच्या कॉलसेंटरमधून मतदारांशी थेट संपर्क साधला जायचा.
तसेच संबधित मतदाराची माहिती घेऊन मतदानाच्या तारखेपर्यंत संपर्क साधला जात असे, आणि पक्षाचे व्हिडीओ आणि ऑडिओ सोशल मीडियावर पाठवले जात. या मोहिमेमुळे भाजपाने मतदारांचा डेटा तयार केला. तसेच मोदींना या मोहिमेमधून सुमारे एक कोटी लोकांनी मिस्ड कॉल दिल्याची माहिती समोर आलीय आणि लाखो लोक मोदींच्या प्रचारात अप्रत्यक्षपणे सहभागी झाले.
मतदारांचा डेटा तयार करण्याची आणि मतदारांचा प्रचारात सहभाग ही आगळीवेगळी मोहिम सर्व प्रथम भाजपनेच तयार केली असून, त्याला चांगलाच प्रतिसाद मिळाल्याचे भाजपने सांगितलंय. आतापर्यंत २० लाख मतदारांची माहिती भाजप पक्षाकडे उपलब्ध झाली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.