टोकियो : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्योजकांना रेड कार्पेट अंथरलंय. भारतामध्ये उद्योगासाठी अतिशय पोषक परिस्थिती असल्याचं नरेंद्र मोदींनी जपानमध्ये उद्योजकांशी संवाद साधतांना म्हटलंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जपान दौऱ्याचा आज चौथा दिवस आहे. त्याचप्रमाणे भारताची लूक ईस्ट तर जपानची लूक इंडिया पॉलिसी असल्याचंही त्यांनी य़ावेळी म्हटलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जपान दौ-याचा आज चौथा दिवस आहे. आजच्या दिवसभरात भारत-जपान दरम्यान अनेक महत्त्वपूर्ण करार होण्याची शक्यता आहे. या करारांमुळे उभय देशांच्या संबंधांवर दुरगामी परिणाम दिसून येतील.
सुरुवातीला मोदी सेक्रेड हार्ट युनिवर्सिटीला पोहोचले, येथे मोदींनी विद्यार्थ्यांशी मोकळेपणाने गप्पा मारल्या. पंतप्रधानांनी जपानी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. या दरम्यान नरेंद्र मोदींनी ग्लोबल वॉर्मिंगपासून ते भारतीय संस्कृती अशा अनेक विषयांवर चर्चा केली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.