'नेहरुंच्या काळात अर्धवट राहिलेलं काम पूर्ण करतोय'

पाचशे आणि एक हजार रुपयांची नोट बंद करण्यावरून काँग्रेसकडून होत असलेल्या टीकेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 

Updated: Nov 14, 2016, 02:03 PM IST
'नेहरुंच्या काळात अर्धवट राहिलेलं काम पूर्ण करतोय' title=

गाझीपूर : पाचशे आणि एक हजार रुपयांची नोट बंद करण्यावरून काँग्रेसकडून होत असलेल्या टीकेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. पंडित नेहरु तुमचं कुटुंब माझ्यावर कठोर शब्दात टीका करतं, पण मी इकडे 14 नोव्हेंबरला तुमच्या जयंतीनिमित्त मुद्दाम आलो आहे. तुमच्या काळामध्ये अर्धवट राहिलेलं काम मला पूर्ण करायचं आहे, असा टोला मोदींनी काँग्रेसला हाणला आहे. 

सत्तेत राहण्यासाठी काँग्रेसनं 19 महिने देशाला जेल बनवलं, पण मी देशाच्या चांगल्यासाठी फक्त 50 दिवस मागत असल्याचंही मोदी म्हणाले. तुम्ही दिलेल्या मतांमुळे आज गरिब शांत झोपत आहे तर भ्रष्टाचाऱ्याला झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागत आहेत, असं वक्तव्य मोदींनी केलं आहे. तसंच गंगेमध्ये कितीही नोटा टाका तुमची पापं धुतली जाणार नाहीत, असही मोदी म्हणाले आहेत. उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमध्ये पंतप्रधानांनी रेल्वे लाईन आणि गंगा नदीवरच्या पुलाचं भूमिपूजन केलं, यावेळी ते बोलत होते.