भाजपसोडून नवज्योतसिंह सिद्धू काँग्रेसमध्ये

क्रिकेटर नवज्योतसिंह सिद्धू यांनी भाजपला रामराम करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राहुल गांधींच्या उपस्थितीत आज दिल्लीत सिद्धूने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 16, 2017, 12:27 PM IST
भाजपसोडून नवज्योतसिंह सिद्धू काँग्रेसमध्ये title=

नवी दिल्ली : क्रिकेटर नवज्योतसिंह सिद्धू यांनी भाजपला रामराम करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राहुल गांधींच्या उपस्थितीत आज दिल्लीत सिद्धूने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे सिद्धू  आता काय करणार याला पूर्ण विराम लागला आहे.

सिद्धु यांची पत्नी नवज्योत कौर आधीपासूनच काँग्रेसमध्ये आहेत. 2004 साली अमृतसरमधून भाजपच्या तिकीटावर राजकारणात प्रवेश केलेल्या सिद्धू यांनी भाजपवर पंजाबमधील राजकारणापासून दूर ठेवलं जात असल्याचा आरोप केला आहे.

नवज्योत सिंह सिद्धू यांना 2014 साली भाजपनं अमृतसरमधून लोकसभेसाठी तिकीट नाकारलं होतं. अमृतसरमधील तिकीट नाकारुन अरुण जेटलींना दिल्यामुळे सिद्धु यांची भाजपवर नाराजी होती.

 राष्ट्रपती नियुक्त खासदार बनवून भाजपनं सिद्धु यांची समजूत काढण्याचा प्रयत्नही केला. मात्र त्यानंतरही नाराज असलेल्या सिद्धु यांनी भाजपला सोडचिट्ठी देत काँग्रेसची वाट धरली आहे. मध्यंतरी सिद्धू आपमध्ये जाणार  असं म्हटलं जात होतं.