www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
छत्तीसगडमध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्यानंतर नक्षलवाद्यांविषयी अनेक छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी समोर येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या क्रूर नक्षलवाद्यांचा म्होरक्या भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांचा जवळचा नातेवाईक आहे.
मिलिंद तेलतुंबडे.... नक्षलवाद्यांचा म्होरक्या... हा मिलिंद तेलतुंबडे म्हणजे भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या बहिणीचे पती आनंद तेलतुंबडे यांचा भाऊ... मिलिंद तेलतुंबडे हा महाराष्ट्रातील सीपीआयचा (माओवादी) सचिव असून सध्या तो फरार आहे. आंध्रप्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, ओडिशा आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागात तो समांतर सरकार चालवण्यासाठी कुप्रसिद्ध आहे. ४७ वर्षीय मिलिंदचं ९३ हजार किलोमीटर परिसरातील दंडकारण्याचा अनभिक्षक्त साम्राज्य पसरलंय.
मिलिंद हा मूळचा महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील राजूरमधला... एका दलित कुटुंबात जन्म घेतलेल्या मिलिंदनं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर ८० च्या दशकात ‘वेस्टर्न कोल फिल्डस’मध्ये नोकरी केली होती. इथल्या मजदूर युनियनमध्ये कार्यरत असताना तो माओवाद्यांच्या संपर्कात आला. नक्सली विचारक अनुराधा आणि तिचा पती कोबाड घांडी यांच्या संपर्कात आलेल्या मिलिंदनं ९० च्या दशकात शस्त्रास्त्र हातात घेतली. मिलिंद हा महाराष्ट्रात माओवाद्यांचा प्रचारक म्हाणून सक्रिय असून विविध राजकिय पक्षांच्या कार्यक्रमास सहकार्य करतो.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.