नवी दिल्ली : मॅगीची पाकिटं नष्ट करण्यासाठी अंबूजा सिमेंटला नेस्ले इंडिया 20 कोटी रूपये देणार आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने मॅगी नूडल्सवर बंदी आणल्यानंतर 'नेस्ले इंडिया‘ने मॅगी नूडल्सची पाकिटे नष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.
मॅगीमध्ये चवीसाठी मोनोसोडियम ग्लुटामेटचा मर्यादबाहेर समावेश केल्याने केंद्रीय अन्न आणि सुरक्षा नियामक मंडळाने मॅगीवर बंदी आणली होती. त्यामुळे "नेस्ले
इंडिया‘च्या नऊ प्रकारच्या नूडल्सवर बंदी घालण्यात आली होती. तसेच बाजारातील नूडल्स परत मागविण्यात आल्या होत्या. "नेस्ले इंडिया‘ने या नूडल्स नष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बाजारातील तब्बल 320 कोटी रुपयांच्या नूडल्स परत मागविण्यात आल्या आहेत.
‘अंबुजा‘च्या महाराष्ट्रातील चंद्रपूर येथील सिमेंट प्रकल्पात या नूडल्सची पाकिटे जाळण्यात येणार आहेत. अंबुजा सिमेंट आता आम्हाला बाजारातून माघारी घेतलेली मॅगी नूडल्सची पाकिटे जाळण्यास मदत करणार आहे‘ असे 'नेस्ले इंडिया‘च्या प्रवक्त्याने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. नूडल्स नष्ट करण्यासाठी बाजारातून नूडल्सचा साठा जमा करणे, कारखान्यापर्यंत पोहचविणे याशिवाय इतर खर्चही होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.