नवी दिल्ली: भारतात मॅगी उत्पादनाला सुरुवात करण्यात आलीय. मॅगीच्या उत्पादनासाठी भारतातील तीन प्रकल्प सोमवारपासून पुन्हा सुरु करण्यात आलेत.
आणखी वाचा - बंदी उठली तरी पुन्हा तपासणी झाल्यानंतरच मॅगीची विक्री
सध्या तरी कंपनीनं कर्नाटक, पंजाब आणि गोवामधील मॅगीचं उत्पातन सुरु केलंय. त्यानंतर इतर राज्यातील मॅगीचं उत्पादन सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे दोन मिनिटांत तयार होणारी मॅगी भारतात पुन्हा आलीय.
आणखी वाचा - नेस्ले सोबतच आता ७ कंपन्यांच्या नूडल्स-पास्ताच्या चौकशीचे आदेश
नेस्ले मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार मॅगीचे ताजे नमूने तीन मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमध्ये परिक्षणासाठी पाठवले जातील. त्यानंतर मॅगी विक्रीसाठी उपलब्ध होईल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.