२००० रुपयांची नोट कोठेही लपवली तरी अशी शोधता येणार?

 चलनातून आता ५००, १००० रुपयांच्या नोटा आज मध्यरात्रीपासून बाद झाल्यात. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले. आता चलनात नव्याने ५०० आणि २००० ची नोट चलणात येणार आहेत. मात्र, २००० ची नोट कोठेही ठेवली किंवा लपवली तरी ती सॅटेलाईटच्या माध्यमातून शोधता येणार आहे.

Updated: Nov 9, 2016, 04:36 PM IST
२००० रुपयांची नोट कोठेही लपवली तरी अशी शोधता येणार? title=

नवी दिल्ली :  चलनातून आता ५००, १००० रुपयांच्या नोटा आज मध्यरात्रीपासून बाद झाल्यात. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले. आता चलनात नव्याने ५०० आणि २००० ची नोट चलणात येणार आहेत. मात्र, २००० ची नोट कोठेही ठेवली किंवा लपवली तरी ती सॅटेलाईटच्या माध्यमातून शोधता येणार आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर जोरदार आहे.

दरम्यान, सोशल मीडियात २ हजार रूपयाच्या नोटेत नॅनो तंत्रज्ञान असल्याची चर्चा असली तरी, या नोटांमध्ये नॅनो-जीपीएस तंत्रज्ञान आहे किंवा नाही याविषयी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोणताही दावा केलेला नाही, यावरून या नोटेत जीपीएस तंत्रज्ञान आहेच असं म्हणता येणार नाही.

रिझर्व्ह बँकेकडून दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाईदेखील पूर्ण झाली आहे. मात्र या नोटा फक्त कागदाच्या नोटा असणार नाहीत. या नोटांची रचना वेगळी आहे. या नोटेमध्ये चीप असणार आहे. भ्रष्टाचार आणि बोगस नोटांच्या निर्मितीला आणि काळ्या पैशाला आळा बसेल असा दावा करण्यात आला आहे.

Image result for 2000 rupees note zeenews

काळ्या पैशाला आलण्यासाठी दोन हजार रुपयांच्या नोटांची रचना वेगळी असणार आहे. या नोटांची निर्मिती करण्यासाठी नॅनो तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय.  नव्याने चलनात येणाऱ्या २ हजार रुपयांच्या नोटांमध्ये एनजीसी (नॅनो जीपीएस चीप) असेल. त्यामुळे नोट कोठेही असली तरी तिचा शोध घेणे सहज शक्य होणार आहे.

नवीन तंत्रज्ञानाला काम करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या ऊर्जेची आवश्यकता नाही. एनजीसी फक्त सिग्नल परावर्तनाचे काम करेल. जेव्हा उपग्रहाकडून एनजीसीकडे त्याचे स्थान जाणून घेण्यासाठी संदेश पाठवला जाईल, तेव्हा २००० हजाराच्या नोटमध्ये असणारी एनजीसी उपग्रहाला सिग्नल पाठवेल. यामुळे नोट नेमकी कुठे आहे, तिचा सिरीअल नंबर नेमका काय आहे, याची माहिती सहज मिळेल.

ही नोट जमिनीखाली १२० मीटर असेल तरी ती शोधून काढता येणे शक्य असेल. एनजीसी यंत्रणा नोटमधून काढता येणार नाही. २००० हजार रुपयांच्या नोटांमध्ये एनजीसी असेल. त्यामुळे प्रत्येक नोट नेमकी कुठे आहे, हे शोधता येईल. शिवाय या नोटेच्या आजूबाजूला नेमकी किती रक्कम साठवून ठेवण्यात आली आहे, याची माहितीदेखील मिळू शकणार आहे.