'त्या' अल्पवयीन दोषीचा चेहरा दाखवा, निर्भयाच्या आईची मागणी

नवी दिल्लीत घडलेल्या निर्भया बलात्कार आणि हत्याकांडातील 'त्या' अल्पवयीन आरोपीला बॉन्ड भरून मोकळं सोडण्याला निर्भयाच्या आई-वडिलांनी विरोध केलाय. 

Updated: Dec 11, 2015, 04:00 PM IST
'त्या' अल्पवयीन दोषीचा चेहरा दाखवा, निर्भयाच्या आईची मागणी title=

नवी दिल्ली : नवी दिल्लीत घडलेल्या निर्भया बलात्कार आणि हत्याकांडातील 'त्या' अल्पवयीन आरोपीला बॉन्ड भरून मोकळं सोडण्याला निर्भयाच्या आई-वडिलांनी विरोध केलाय. 

त्याला मोकळं सोडायचं असेल तर त्याचा चेहरा अगोदर लोकांसमोर आणा... म्हणजे लोकांना त्याच्याबद्दल माहिती मिळेल आणि ते त्याच्यापासून सुरक्षित राहतील, असं निर्भयाच्या आईनं म्हटलंय. तर बाहेर पडल्यानंतर आपला चेहरा लोकांसमोर आला तर आपल्या भविष्याचं काय? असा प्रश्न या दोषीला पडलाय.  

या महिन्यात या खटल्यातील अल्पवयीन आरोपी तीन वर्षांची शिक्षा भोगून बालसुधार गृहातून बाहेर येणार आहे. चांगल्या व्यवहाराबद्दल त्याच्याकडून एक लीगल बॉन्ड भरून घ्यायचा विचार सध्या केंद्रीय गृह मंत्रालय विचार करतंय. कारण, तीन वर्षांची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्याला तुरुंगात ठेवणं कायदेशीररित्या शक्य नाही.

सुटकेनंतर तो 'सुरक्षा रक्षका'चं काम करणार?
पीटीआयनं दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन दोषी बाल सुधारगृहातून सुटका झाल्यानंतर शांति कायम राखण्यासाठी 'सुरक्षा रक्षक' म्हणून काम करणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.