पंतप्रधान मोदींच्या सोशल मीडिया अकाऊंटवर कोणताही खर्च नाही

पंतप्रधान कार्यालयाने एका आरटीआय संदर्भात उत्तर देतांना म्हटलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोशल मीडिया अकाउंटच्या मेंटेनेंससाठी कोणताही खर्च नाही केला जात. हा आरटीआय आपचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसौदिया यांनी दाखल केली होती.

Updated: Mar 18, 2017, 10:48 AM IST
पंतप्रधान मोदींच्या सोशल मीडिया अकाऊंटवर कोणताही खर्च नाही title=

नवी दिल्ली : पंतप्रधान कार्यालयाने एका आरटीआय संदर्भात उत्तर देतांना म्हटलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोशल मीडिया अकाउंटच्या मेंटेनेंससाठी कोणताही खर्च नाही केला जात. हा आरटीआय आपचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसौदिया यांनी दाखल केली होती.

सिसौदिया यांनी आरटीआय दाखल केल्यानंतर पीएमओने म्हटलं की, पंतप्रधानांच्या सोशल मीडिया अकाउंटच्आ मेंटेनेंससाठी मे २०१४ पासून एक रुपयाही खर्च केला गेलेला नाही.

पीएमओने म्हटलं की, पंतप्रधानांच्या ऑफिशियल अॅप ‘पीएमओ इंडिया’ला मायगाव कॉन्टेस्टमध्ये सहभागी घालेल्या एका स्पर्धकाने डेव्हलप केलं होतं. त्यामुळे यावर बक्षीस रुपातील पैशांशिवाय इतर कोणताही खर्च केला गेलेला नाही. हा अॅप पीएमओ मेंटेन करतो. पंतप्रधानांची वेबसाइट www.pmindia.gov.in पीएमओने ही डेव्हलप केली आहे आणि मेंटेनही करत आहे.

पीएमओने आरटीआयचं उत्तर देतांना म्हटलं की, सोशल मीडियाच्या दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर पंतप्रधानांची उपस्थितीही पीएमओच बघतो यावर कोणताही इतर खर्च केला जात नाही. फेसबूक, ट्विटर, यूट्यूब, गूगल किंवा जीमेलवर सोशल मीडिया कॅम्पेन पीएमओकडूनच चालवलं जातं.