असहिष्णुतेबाबत नरेंद्र मोदींच्या भूमिकेची खिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी असहिष्णूदेबाबत ब्रिटनमध्ये केलेल्या खुलाशाबाबत विरोधकांनी टिकेचा सूर आळवण्यास सुरुवात केली आहे. भारत ही बुद्ध आणि गांधी यांची भूमी आहे याचा भारतात आल्यावर पंतप्रधान मोदींना विसर पडतो का, असा सवाल काँग्रेस नेते आनंद शर्मां यांनी उपस्थित केला.

PTI | Updated: Nov 13, 2015, 11:10 AM IST
असहिष्णुतेबाबत नरेंद्र मोदींच्या भूमिकेची खिल्ली title=

 नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी असहिष्णूदेबाबत ब्रिटनमध्ये केलेल्या खुलाशाबाबत विरोधकांनी टिकेचा सूर आळवण्यास सुरुवात केली आहे. भारत ही बुद्ध आणि गांधी यांची भूमी आहे याचा भारतात आल्यावर पंतप्रधान मोदींना विसर पडतो का, असा सवाल काँग्रेस नेते आनंद शर्मां यांनी उपस्थित केला.

त्यानंतर राष्ट्रवादीनेही मोदींना टोला लगावलाय. देर आये दुरुस्त आहे, असं म्हणत राष्ट्रवादीच्या मजीत मेमन यांनी मोदींच्या वक्तव्याची खिल्ली उडवलीय. जेडीयू नेते केसी त्यांगींनीही नरेंद्र मोदींच्या ब्रिटनमधील वक्तव्यास अहसमती दर्शवली आहे.

अधिक वाचा : दहशतवादाला थारा देणाऱ्यांची ओळख व्हायला हवी; ब्रिटनच्या संसदेत मोदी

ब्रिटन हे भारतासाठी युरोपचे प्रवेशद्वार असल्याचे मत व्यक्त करत मोदी यांनी भारतामध्ये असहिष्णुता सहन केली जाणार नसल्याचे म्हटले होते. ब्रिटनमध्ये प्रवेशबंदी घातल्यानंतर १० वर्षांनी या देशाच्या दौऱ्यावर आलेल्या भारतीय पंतप्रधानांचे जोरदार स्वागत करण्यात आले. 

भारत ही गौतम बुद्ध व महात्मा गांधी यांची भूमी असून येथे असहिष्णुतेस कोणतेही स्थान नसल्याचे मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले. भारताच्या कानाकोपऱ्यात घडणारी, असहिष्णुता दर्शविणारी कोणतीही घटना सहन केली जाणार नाही. यासंदर्भात कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यात येईल. १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या भारत देशामध्ये अशा स्वरुपाची घटना एखाद दुसरी असेल; तरीही आम्ही त्याकडे दुर्लक्ष करणार नाही, असे मोदी म्हणालेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.